नोटा बंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचे नक्की काय झाले, असा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर या नोटांचाही उपयोग केला जात असून त्याच्यापासून चेन्नईतील पुझाल तुरुंगा तील कैदी फाईलसह इतर साहित्य तयार करीत आहेत. यासाठी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 25 ते 30 कैद्यांच्या एका टीमला खास प्रशिक्षण देण्यात आले असून हातानेच या फायली तयार केल्या जातात. यासाठी रिझर्व्ह बँकेने खराब झालेल्या, बंद करण्यात आलेल्या 70 टन नोटा तुरुंग प्रशासनाला देण्याची तयारी केली असून आतापर्यंत नऊ टन नोटा प्रत्यक्षात तुरुंगाला मिळाल्या आहे.आतापर्यंत 1.5 टन नोटांपासून फायली तयार करण्यात आल्या असून रोज एक हजार फायली तयार केल्या जातात. यासाठी कैद्यांना 160 ते 200 रुपये भत्तादेखील दिला जातो. सध्या हाताने फायली तयार करण्याचे मशिन असले तरी सेमी ऑटोमॅटिक मशिन चाही प्रस्ताव असल्याचे मुर्गेशन यांनी सांगितले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews